रेवण्‍ासीध्दीच्या झाडाखाली खुप  वर्षापुर्वी घ्‍ानदाट जंगलात दृक्ष्‍ा नावाचा साधु त्या झाडाखाली सहवास करीत होते.  त्यांनी उदर निर्वाहासाठी ५-६ गायी प‍ाळल्या होत्या त्या कालावधीत कोल्हाप‍ूरचे महाराजे शाहू छत्रपती शिकारीसाठी फिरत फिरत त्या ठिकाणी आले असता ते साधु व गायी त्यांच्या नजरेस पडल्या असता त्यांनी साधुला  प्रश्न केला तुम्ही येथे कशासाठी आला आहात? तर त्या साधुनी मी येथे जप‍ करण्‍यासाठी आलो आहे असे सांगित‌ले.

महाराजांनी त्यांच्या उदर नि‍र्वाहाबाबत विचारप‍ूस केली असता त्‍‍या सांधुनी सांगीतले की, माझ्या गायी असून मी त्‍‍यावरती उदर नि‍र्वाह करता. त्‍‍यावेळ‍ी महाराजांनी गायींब‌द्द‌ल‌ वि‍चारप‍ूस केली व प‍ि‍ण्‍यास प‍ाणी कोठे मि‍ळ‍ते असे वि‍चारले असता साधुनी सांगीतले की, या गायी चरत चरत कुठेतरी खाली जातात व ति‍थुन प‍ाणी प‍ि‍वून वरती येतात. त्‍‍यावेळ‍ी महाराजांनी गायींचा तप‍ास केला असता तेथील भागात त्‍‍यांना झरा दृष्‍ट‍ीस प‍डला.

व तेथुन गावी प‍रतत असताना घोड्यावर बसताना घोड्याच्‍या प‍ाठीवरील खोगल खाली प‍डले तेंव्‍हाप‍ासून तेथल वस्‍तीस खोगल ऐवजी कोगील असे नांव प‍डले, त्‍‍याची नोंद करविर काशी ग्रंथात आहे. व त्‍‍या झर्‍याचे नांव नागसरा म्‍‍हणून प्रसिध्‍द आहे. त्‍‍या काळ‍ी त्‍‍या झर्‍याचे प‍ाणी २, ३ गावचे लोक वाप‍रत असत. तो झरा कधीही न आट‍रणारा आहे. अजुनही त्‍‍या झर्‍याचा प‍ि‍ण्‍याच्‍या प‍ाण्‍यासाठी वाप‍र केला जातो. त्‍‍या झर्‍याभोवती देवस्‍थान वसले आहे. गणेश मुर्ती अविस्मरनीय आहे. तसेच त्‍‍या ठि‍काणी गावचे दै‍वत गै‍बीप‍ीर म्‍‍हणून देवस्‍थान वसले आहे. त्‍‍या झर्‍यावरती साती-आसरा देवीची रोज प‍ुजा होते.  

गावचे ग्रामदै‍वत मारुती देवालय असून गावच्‍या सभोवती डोंगर वसला असून ते गांव दरीत वसले आहे. गावाच्‍या सभोवती अनेक मंदीरे आहेत. शिवप‍ार्वती, भैरोबा, ख्‍ांडोंबा, म्‍‍हसोबा, मरगाबाई, हनुमंत इत्‍‍यादी देवस्‍थान असून सदर भागात प‍ांडर असे म्‍‍हण्‍ातात. सदरच्‍या प‍ांडर भागात प‍ूर्वजांप‍ासून वहीवाट‍ सुरु आहे. त्‍‍यागावामध्‍ये आता सर्व जाती ध्‍ार्माचे लोक गुण्‍यागोवि‍दाने राहत आहेत.

उदय जाध्‍ाव व शिवाजी गुडाळ‍े इ. शाहू साख्‍ार कारखान्‍‍याचे मल्‍‍ल होउन गेले. गावचे मर्दानी खेळ‍ लेझीम व ढ़ोल वादक‌ प्रसि‍ध्‍द आहेत‌. १९९९ साली प‍ाणी अडवा प‍ाणी जि‍रवा प‍ाण्‍ालोट क्षेत्राखाली मा. कृषीमंत्री श्रीप‍तराव बोन्द्रे यांनी ना. श्‍ारद प‍वार मुख्‍यमंत्री असताना या छोटयाशा गावात वि‍हीर खुदाई नि‍मि‍त्‍‍ताने गावाला भेट‍ देवून गावाचे नंदनवन केले.